NMMS Scholarship Exam Apply Online 2026-27 : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2026-27 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2026-27 इ. 8 वी साठी सन 2007-08 पासून इयत्ता 8 वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
1. NMMS Scholarship Exam आवश्यक पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
- पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न रु. 3,50,000/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदार / तलाठी यांचा सन 2025-26 च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
- विद्यार्थी/विद्यार्थिनी इ. 7 वी मध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
- खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत:
- विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
- केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
- जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
- शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
- सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
अधिकृत सूचना पत्र (Press Note)
2. NMMS Scholarship Amount | शिष्यवृत्ती दर
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. 9 वी ते इ. 12 वी पर्यंत दरमहा रु. 1,000/- (वार्षिक रु. 12,000/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.
3. विद्यार्थ्यांची निवड
विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
4. NMMS Scholarship परीक्षेचे वेळापत्रक व स्वरूप
1) बौध्दिक क्षमता चाचणी — Mental Ability Test (MAT)
- एकूण गुण : 90
- एकूण प्रश्न : 90
- कालावधी : 90 मिनिटे (दिव्यांगासाठी : 30 मिनिटे जादा वेळ)
- वेळ : 10.30 ते 12.00
- विश्रांती : 12.30 ते 13.30
2) शालेय क्षमता चाचणी — Scholastic Aptitude Test (SAT)
- एकूण गुण : 90
- एकूण प्रश्न : 90
- कालावधी : 90 मिनिटे (दिव्यांगासाठी : 30 मिनिटे जादा वेळ)
- वेळ : 13.30 ते 15.00
- पात्रता गुण (एकत्रित) : 40% (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32% मिळणे आवश्यक आहेत.)
5. परीक्षेसाठी विषय
सदर परीक्षेसाठी 2 विषय असतील. प्रत्येक पेपरसाठी A,B,C,D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.
a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT)
ही मानसशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
b) शालेय क्षमता चाचणी (SAT)
ही सामान्यतः इयत्ता 7 वी व इयत्ता 8 वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये तीन विषय असतील:
- सामान्य विज्ञान (एकूण गुण - 35)
- समाजशास्त्र (एकूण गुण - 35)
- गणित (एकूण गुण - 20)
उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल:
- सामान्य विज्ञान 35 गुण : भौतिकशास्त्र 11 गुण, रसायनशास्त्र 11 गुण, जीवशास्त्र 13 गुण.
- समाजशास्त्र 35 गुण : इतिहास 15 गुण, नागरिकशास्त्र 05 गुण, भूगोल 15 गुण.
- गणित : 20 गुण.
6. परीक्षेचे माध्यम
परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.)
7. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या
अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी 11682 इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे.
8. NMMS Scholarship Apply Online Time Table 2026
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक व शुल्क खालीलप्रमाणे आहे:
| प्रकार | दिनांक | शुल्क |
|---|---|---|
| 1) नियमित शुल्कासह | 08/09/2026 ते 07/10/2026 | रु. 120/- (शाळा संलग्नता फी रु. 200/-) |
| 2) विलंब शुल्कासह | 08/10/2026 ते 14/10/2026 | रु. 240/- |
| 3) अतिविलंब शुल्कासह | 15/10/2026 ते 21/10/2026 | रु. 360/- (480/-) |
9. NMMS Scholarship Apply Online 2026-27 | ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
दिनांक 08/09/2026 पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
10. NMMS विद्यार्थी ऑनलाइन अर्ज कसा भरावा?
सर्वप्रथम अधिकृत पोर्टल उघडा. School Login मध्ये आपल्या शाळेच्या UDISE Code आणि Password च्या माध्यमातून लॉगिन करा.
विद्यार्थी अर्जामध्ये भरावयाची महत्त्वाची माहिती:
11. 1) विद्यार्थ्याची प्राथमिक माहिती
UDISE Code व Standard 8 वी आपोआप येईल. शाळा प्रकार व शासकीय सुविधांचा लाभ घेतो का याची नोंद करा.
12. 2) विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी
विद्यार्थ्याचा Photo with Signature अपलोड करावा. स्वाक्षरी स्पष्ट असावी. फोटो/स्वाक्षरीच्या इमेजचा आकार 2 KB ते 100 KB असावा.
13. 3) वैयक्तिक माहिती
आडनाव, नाव, पालकांचे नाव, लिंग, जन्मतारीख, आधार क्रमांक (असल्यास) आणि इयत्ता 7 वीची Grade व टक्केवारी भरावी.
14. 4) सामाजिक व इतर माहिती
Rural/Urban, दिव्यांग माहिती, जात संवर्ग व EWS आरक्षणाची नोंद करावी.
15. 5) पत्ता व बँक माहिती
विद्यार्थ्याचा पूर्ण पत्ता, PIN Code, परीक्षेचे माध्यम आणि उपलब्ध असल्यास बँक खाते क्रमांक व IFSC Code भरावा.
16. 6) Family Details
पालकांचे शिक्षण, व्यवसाय, कुटुंबातील सदस्य संख्या, पालकांचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी आणि वार्षिक उत्पन्न भरावे.
17. 7) Declaration व Submit
माहितीची खात्री करून Preview तपासा व Submit करा. त्यानंतर Make Payment मधून परीक्षा शुल्क भरावे.
18. निकाल घोषित करणे
सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी 2027 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. निकाल फक्त परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जाईल.
19. अनधिकृततेबाबत इशारा
शिक्षण मंत्रालय (MoE), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही संस्थेस ही परीक्षा घेण्याचा अधिकार नाही.
20. महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
21. अधिकृत सूचना पत्र (Press Note)
22. आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 3.5 लाखांपेक्षा कमी), इ. 7 वी चे गुणपत्रक, जात प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास).
23. शाळा लॉगिन मार्गदर्शक
फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः न भरता आपल्या शाळेतील मुख्याध्यापक / वर्गशिक्षक यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
24. परीक्षेची तयारी कशी करावी?
इयत्ता 7 वी व 8 वी च्या विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित विषयांचा कसून सराव करा तसेच बौद्धिक क्षमता चाचणीसाठी (MAT) तर्कशुद्ध प्रश्नांचा सराव करा.
25. संपर्क व मदत
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

